विविध प्रायश्चित व देवनिंदा

श्री शनीदेव हे दैवत भारतीय हिंदू धर्मातील अन्य देव- देवतांपेक्षा थोडेसे वेगळे म्हणजे अत्यंत कडक व जहाल होय. आपल्या सर्व देवांमध्ये सर्व श्रेष्ठ म्हणून जर श्री शानिदेवांचा उल्लेख केला तर तो अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. त्रिभुवनात भीती असणाऱ्या श्री शंकराच्या राशीत श्री शनिदेव गेले, तर ह्या श्री शनिदेवाला घाबरून शंकराने कैलासात पलायन केले. एवढा धाक शंकराला श्री शनिदेवाचा होता.

उज्जैनीचा राजा विक्रम हा धर्मनिष्ठ व एकनिष्ठ राजा म्हणून ज्ञात होता. परंतु राजा विक्रमाने अनावधाने श्री शानिदेवांची निंदा केल्यामुळे राजा विक्रमाला ७|| वर्ष खूप हाल आपेष्टा सहन कराव्या लागल्या. अशा अनेक गोष्टी शनी महात्म्य मध्ये वाचा वयास मिळतात. विक्रम राजा सारखे विपुल अनुभव शनी शिंगणापूरच्या श्री शनिदेवाबद्दल बोलले जात आहेत.

जत संस्थांमधील व्यापारी श्री जेठाभाई गुजराथी काही भाविकांच्या आग्रहावरून शनी शिंगणापूरला आले. प्रस्तुत मूर्ती पाहून त्यांनी श्री शानिदेवाबद्दल त्या मूर्ती बद्दल काही आनुदगार काढले व दर्शन न घेताच परत निघाले, परंतु मोटारीत बसताच त्यांच्या नाकाचा शेंडा काळा झाला,प्रवासात डाग मोठा होऊन संपूर्ण तोंड काळे झाले. त्यांनी तो डाग पुसण्याचा,धुण्याचा खूप प्रयत्न केला,पण डाग काही केल्या जाईना. अखेर डॉक्टरांचे औषध सुरु केले. तरीही उपयोग नाही,लगेच त्यांना मोटारीत बसतानाच काळा डाग आठवला व देवाबद्दल अपशब्द आठवले.शेवट हा शानिदेवाचाच चमत्कार आहे याची जाणीव होऊन ते पुन: शनी शिंगणापूरला आले, पूजा पाठ, अभिषेक केला, देवाची माफी मागितली आणि आश्चर्य डाग नाहीसा झाला.

अशाच प्रकारे नेवासा तालुक्याचे मामलेदार श्री औटीसाहेब,जे श्रीरामपूर तालुक्यातील मालुजे गावचे मूळ निवासी होते त्यांनी सुध्दा देवाची निंदा केली परिणामी त्यांच्या पाठीवर झालेला मोठा फोड काही केल्या बरा होईना. श्री शनिदेवाच कोप आहे असे कुणीतरी सांगितल्यावर ते शनी शिंगणापूरला आले,यथासांग पूजा अर्चा केली, क्षमा मागितली.फोड नाहीसा झाला.

सोनी येथील श्री शंकरराव कुलकर्णी यांनी श्री शनिदेवाची अशीच अवहेलना केली होती. लगेच त्यांच्या अंगात ताप भरला, बेचैन झाले. सर्व उपाय केले ताप काही जायेना.शेवटी चूक त्यांच्या लक्षात आली.देवाची माफी मागितली,ताप लगेच गेला आणि ते चांगले झाले.

जगह

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल मानचित्र