श्री क्षेत्र शनी शिंगणापुरचे शनी तीर्थक्षेत्र म्हणून आज जे देशभरात नाव आहे, त्याचे महत्व आहे ते वाढविण्याचे श्रेय एकमात्र आद्य संत – महंत उदासी महाराजांना आहे. म्हणूनच आज देवस्थान ने ग्रामदेवता लक्ष्मी आईच्या मंदिराच्या समोरील बाजूस श्री संत उदासी बाबा यांची समाधी बांधलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा संतांची भूमी म्हणून प्रसिध्द आहे.नेवासा तालुका परिसरात प्रवरा नदीच्या विकासात, प्रगतीत अनेक संतांचा मोठा वाटा आहे, पण त्यातल्या त्यात उदासी बाबा काकणभर सरस आहेत.
तीर्थक्षेत्र म्हटल कि भक्तांचे येण – जाण. भक्त वाढले म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेसाठी सर्व गावकर्यांचे सहकार्य मोठे होतेच. पण त्यातल्या त्यात स्वच्तेसाठी श्री शनैश्वर देवतेसाठी समर्पित जीवन जगणारे श्रेष्ठ संत होते – उदासी बाबा ! महंत
उदासी बाबांचे जीवन चरित्र :-
श्री शनीदेवाच्या कृपेने शनी शिंगणापूर थे घर संसारात नैराय, अपयश, दु:खी असलेल्या लोकाचा समूह जास्त येत असे. अशाच प्रकारचा एक समस्याग्रस्त सज्जन तिथे होता, जे बालयोगी संन्याशी होते. ह्या बालयोगी संन्यासी बाबांना च उदासी बाबा म्हणत असे. उदासी बाबांचे मूळ गाव नेवासा तालुक्यातील गोंदेगाव होते.असे म्हणतात बाबा शनीच्या साडेसाती ने त्रस्त होते, म्हणूच जीवनात, संसारात उदास झाले,विरक्त झाले म्हणूनच कि काय लोक त्यांना उदासी बाबा म्हणू लागले. संकटग्रस्त बालयोगी संन्यासी चे कशात मन रमेना. शेवटी ते काही मार्ग काढण्यासाठी पदयात्रेने शनी शिंगणापूरला आले. आपल्याला असे सुध्दा म्हणता येईल कि श्री शनिदेवाला त्यांना जवळ बोलवायचे होते, म्हणूनच त्यांना संकटात टाकून चुंबकीय शक्तीने त्यांना आपल्या जवळ आकर्षित करून घेतले.
दैनंदिन जीवनाच्या आपत्तीत फसलेल्या बालयोगी संन्याशी बाबाने तन-मन धना ने शनी भगवानाची सेवा केली.कालांतराने ते सेवा करत – करत शनी शिंगणापूरचे नागरिक झाले,श्री उदासी बाबांचे पशु-पक्षी प्राण्यांवर खूप प्रेम होते. म्हणूनच कि काय त्यांनी आपल्या छंदासाठी एक गाय, बैल व एक वासरू पाळलेल होत. ह्या पाळीव प्राण्यावर ते जशी आई आपल्या बाळांवर वात्सल्य प्रेम करीत असते तव्द्तच बाबा आपल्या प्राण्यांवर आई सारखे प्रेम करीत असत. असे म्हणतात कि श्री शानिदेवाने त्यांची सेवा पाहूनच मेवा रूपाने त्यांची साडेसाती समाप्त केली.स्वत: शनी देवानेच त्यांना आपल्या जवळ ठेवून सेवा रूजवात करून घेतली. श्री शनी देवाच्या आज्ञेने उदासी बाबा रात्रंदिवस श्री शनी देवांची पूजा – अर्चा, धुप – दीप, नैवैद्य, आरती,प्रार्थनेत मग्न असत.
महंत उदासी बाबांची सतत श्री शनीदेवा बद्दलची असलेली श्रद्धा, उपासना, समर्पण भावना पाहूनच तेथील ग्रामस्थांनी त्यांना श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता.नेवासा देवस्थानचे पुजारी होण्याविषयी विनंती केली. या विनंतीला बाबांनी श्री शनिदेवाची आज्ञा समजून सहर्ष स्वीकृती दिली.श्री शनिदेवाचे अधिकृत पुजारी झाल्यावरच बालयोगी संन्यासी चे उदासी बाबा हे नामकरण प्रसिध्द झाले.
महंत उदासी बाबांनी मोठय आसक्तीने श्री शनिदेवाची सेवा केली. आश्चर्याची गोष्ट अशी कि बाबांची कार्यशैली , कर्मठता पाहूनच शनी शिंगणापूरच्या आजूबाजूच्या गावात श्री शानिदेवांची कीर्ती पसरली. म्हणूनच लोक पायी किवा बैल गाडी, सायकल सारख्या मिळेल त्या वाहनाने शनी शिंगणापूरला श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी येऊ लागले. परिणामस्वरूप शनी शिंगणापूरची ख्याती पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे लोकांची अफाट गर्दी शनी शिंगणापूर कडे यायला लागली. मी उदासी बाबांच्या चरित्राकडे यामुळे आकर्षित झालो कि, बाबांनी थे येणाऱ्या सर्व शनी भक्तांसाठी आवश्यक त्या सुख सोयीकरिता जातीने लक्ष घालून श्री शनिदेव व भक्त यांच्या सेवेचा विडाच जणू उचलेला होता. देवस्थानचा कारभार हि त्यांनी व्यवस्थित सांभाळला. सर्व ग्रामस्थ उदासी बाबाच्या कामकाजावर प्रसन्न होते.
अशा प्रकारे महंत उदासी बाबांनी जवळपास ३५ वर्ष श्री शनिदेवाची निरंतर सेवा करत – करतच ते वृध्दापकाला कडे झुकले. पुढे म्हातारपणी साधारण आजारपणातच त्यांना मृत्यू ओढवला. त्यांच्या मृत्युच्या बातमीने परिसरात दुख:ची शोककळा पसरली. अबाल वृध्द सर्वच ढस ढसा रडत होते. पूर्ण गाव शोक सागरात बुडाले. असे म्हणतात कि बाबांच्या मृत्युनंतर त्यांच्या बैलाने दोन दिवस चारा-पाणी काहीही घेतले नाही सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी कि तीन दिवसांपर्यंत ह्या बैलाच्या डोळ्यातून सतत आश्रू वहात होते. अशा प्रकारे निष्पाप प्राण्यांनी सुध्दा बाबांना आश्रुपूर्ण श्रद्धाजली वाहिली. गावकर्यांनी कृतज्ञतेची जाणीव ठेवून उदासी बाबांची तिथेच समाधी बांधली, व एक भले मोठे तैल चित्र हि तिथे लावले आहे. समोरच एक संगमरवरी मूर्ती तयार करून, मूर्ती समोर सर्व शनी भक्त बाबांचे पण दर्शन घेत असतात. अशा कर्मठ,तपस्वी उदासी बाबांना शतश: प्रणाम !!