महाराष्ट्र, भारतात तर सर्वच शनी शिंगणापूरच्या महिमेशी परिचित आहेत, परंतु श्री शनिदेवाची कीर्ती सात समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचली आहे. परदेशात सुध्दा ह्या देवाने अनेकांना चमत्कृत व आकर्षित केलेले आहे, उदाहरणार्थ झिम्बाब्वेचे अनिवासी भारतीय श्री जयेश शहा अधून – मधून भारतात शनी शिंगणापूर ला येऊन श्री शनी देवाचे दर्शन घेत असतात. श्री जयेश शहा हे तर फ़क़्त श्री शनी देवाच्या दर्शनासाठीच आपला झिम्बाब्वेतील उद्योग व्यापार सोडून इथे येत असतात. यांचा झिम्बाब्वेत आयात – निर्यात चा मोठा व्यवसाय आहे, परंतु काळचक्रात ते अटकले, मोठे कर्जबाजारी झाले, व्यवसाय ठप्प पडायला लागला होता, सर्व संपत्तीला टाळेबंदी घोषित झाली. शेवटी ते मुंबईत आले. एका जोतीषीला दाखविले, त्यांच्या कुंडलीच्या आनुषगाने त्यांनी शनीचे दर्शन करावयाचे सुचविले, जोतिषशास्त्र व जोतिषाच्या सल्ल्याप्रमाणे ते शनी शिंगणापूरला आले. श्री शनी देवाची पूजा – अर्चा, अभिषेक केला. परिणामी स्थिती थोडी – थोडी सुधारली. आपल्या उदोगाचे काम पुन: सुरु झाले, कारभार वाढला, स्थिती पुन: सुधारली. त्यांची पूर्ण खात्री झाली कि श्री शानिदेवामुळेच माझी आजची स्थिती झाली, उत्कर्ष झाला. म्हणून त्यांनी श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थानसाठी ८ लाख रुपयाची अम्बुलस गाडी येथील धर्मार्थ दवाखान्यासाठी सप्रेम भेट म्हणून दिली. आमच्या एका भेटीत त्यांनी प्रामाणिकपणे कबुल केले कि माझी परिस्थिती श्री शनिदेवाच्या कृपेनेच सुधारली. अन्यथा मी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास निघालो होतो. आता अनेक वेळा झिम्ब्बावे हून भारतात श्री शनिदेवाचे दर्शनासाठी वरचे वर येत असतात.
स्वित्झरलैड चा पण अनुभव काहीसा झिम्बाब्वे सारखाच आहे. हिंदी सिनेमाचा अभिनेता विरार का छोरा व खासदार गोविंदा आहुजा यांचा आहे. श्री गोविंदा १९९६ मध्ये एका चित्रपटाच्या शुटींगसाठी स्वित्झरलैड ला गेलेले होते, तिथे काय चमत्कार त्यांना घडला माहित नाही. परंतु ते
दुस-याच दिवशी शुटींग तिथे चालू असताना अर्धवट सोडून शनी शिंगणापूरला दर्शनासाठी आले व शनी दर्शन आटोपताच ते लगेच येथून थेट पुन: स्वित्झरलैडला गेले. आर्थात हि सर्व जादू श्री शनी देवाचीच होय. जे आपल्या भक्तांना परदेशातून सुध्दा इकडे आकर्षित करते.
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात नात व केंद्रीय मंत्री श्री सुनील दत्त हे सुध्दा आपल्या फिल्म अभिनेता संजय दत्त मुलासाठी, तो टाडा जेल मधून सुटताच ते दोघे तडक सर्वप्रथम शनी शिंगणापूरला आले. श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी श्रीदेवी, गुजरात चे मुख्यमंत्री श्री नरेद्र मोदी, अमरीश पुरी, रणधीर कपूर, ऋषी कपूर, व्यंकटेश प्रसाद इत्यादी अनेक दिग्गज श्री शनिदेवाच्या दर्शनाने लाभन्वित झालेली आहेत.