आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे. शनिची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या ९५ पट अधिक आहे. शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी १९ वर्षे लागतात. अंतराळात शनि गर्द, निळसर , प्रकाशमान , सुंदर बलशाली दिसतो. पृथ्वीला जसा चंद्र एक उपग्रह आहे तसे शनीभोवती २२ उपग्रह आहेत.
शनिची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो, ज्या कल्पना, योजना आखतो त्याची चांगली अथवा वाईट चुंबकीय शक्तीने शानिपर्यंत पोहचते. फलस्वरूप चांगल्याच परिणाम चांगला वाईटाचा परिणाम वाईट तत्काळ दिसून येतो. वाईट प्रभावाला फलज्योतिष मध्ये अशुभ मानलेले आहे , तर चांगल्याचा परिणाम शुभ मानला आहे… म्हणून आपण शनीला शत्रु नाही मित्र समजावे अन्यथा वाईट कामाबद्दल आपल्यामागे आहे. संकटे आहेत शत्रुत्व आहे.
श्री शनिदेवाची जन्मगाथा उत्पत्ती संदर्भात वेगवेगळ्या कथा आहेत. श्री शनिदेवाची सर्वात प्रचलित उत्पत्ती गाथा स्कंध पुराणातील काशी खंडात अशा प्रकारची आहे.
श्री शनैश्वरच्या वडिलांचे नाव सूर्यदेव व आईचे नाव संज्ञा होते. संज्ञा ही ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याची कन्या होती. संज्ञा ही फारच स्वरूपान व रुपवती कन्या होती. दक्षाने आपल्या कन्येचे लग्न सूर्याशी करून दिले. संज्ञा सूर्यदेवाचे तेज सहन करू शकत नव्हती. संज्ञेला असे वाटत होते की , मी स्वताच तपश्र्चर्या करून तेज वाढवावे म्हणजे सूर्याचे तेज सुसह्य होईल.परंतु सूर्याची ती पतिव्रता नारी होती.सूर्यामुळे संज्ञेला तीन अपत्य झाली १) वैवस्वत मनु २) यमराज ३) यमुना
संज्ञा आपल्या मुलांवर खूप प्रेम करीत होती , परंतु सूर्याचे तेज सहन करू शकत नव्हती. एके दिवशी संज्ञाने विचार केला की सूर्यापासून वेगळे होऊन आपल्या माहेरी जाऊन तिथे तपश्र्चर्या करू अन् तिथेही विरोध झाला तर दूर कुठे तरी एकतांत जाऊन तपश्र्चर्या करून प्रथम संज्ञाने आपल्या तपश्र्चर्येने आपल्या सारख्याच दिसणाऱ्या एका छायेची निर्मीती केली जिचे नाव सुवर्णा ठेवले.सुवर्णाला आपल्या मुलांची जबाबदारी सोपवताना संज्ञा म्हणाली.
” सुवर्णा आजपासून माझ्या ऐवजी तू नारी धर्म संभाळ , अन् माझ्या मुलाबाळांचे पालन पोषण तू स्वतः कर. हे करताना जर काही अडचण आली, तर मला बोलव, मी लगेच येईन , पण एक गोष्ट लक्षात ठेव तू सुवर्णा आहेस संज्ञा नाहीस हे रहस्य कुणालाही कळता कामा नये. ”
संज्ञा सुवर्णाला आपली जबाबदारी सोपवून माहेरी निघून गेली. घरी गेल्यावर वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. ऐकताच वडिलांनी संज्ञाला रागवून फटकारले की ” न बोलविता मुलगी जर माहेरी आली तर तो दोष पिता-पुत्रीला लागतो. म्हणून तू लगेच आपल्या सासरीसूर्याजवळ जा”..
संज्ञा मनात विचार करायला लागली की जर मी परत गेले तर माझ्या छाया – सुवर्णाला जे कर्तव्य सोपविलेले आहे त्याचे काय होणार ? ती कुठे जाणार ? शेवटी आमच्यातल रहस्य बाहेर येणार. शेवटी ती निब्बिड वनात जो उत्तर कुरुक्षेत्र आहे तिथे शरण गेली. आपल्या सौदर्यांची व यौवनबद्दल तिला भीती वाटत होती. म्हणून तिने ” बडवा घोडी ” रूप धारण केले ज्या मुळे तिला कुणी ओळखणार नाही. मग ती तपश्र्चर्याला लागली.
इकडे सूर्य व छाया – सुवर्णा ला तीन मूले झाली. पती पत्नी एकमेकाबरोबर खूप प्रेम करीत. त्यामुळे सूर्याला शंकेचे कारणच नव्हते. यांच्या मुलांची नावे अशी – १) मनु २) श्री शनीदेवा ३) पुत्री भद्रा ( तपती )
श्री शनिदेवाच्या उत्पत्ती संदर्भात दुसरी कथा अशी की, श्री शनिदेवाची निर्मीती महर्षी कश्यपच्या यज्ञातून झाली. जेव्हा शनि छाया – सुवर्णाच्या गर्भात होता तेव्हा शिव भक्तीने सुवर्णा ने शिवाची इतकी तपश्र्चर्या केली की, ती आपले खाण पिणं सुद्धा विसरून जात असे. तिच्या अशा तपश्र्चर्येमुळे गर्भातच शनीचा रंग काळा झाला. शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव शनीचा काळा रंग पाहून हैराण झाले. सुर्याला सुवर्णाची शंका आली, अन् लगेच सूर्याने सुवर्णाचा अपमान करीत सांगितले की हा मुलगा माझा नाही.
श्री शनिदेवाच्या अंगात जन्मतः आईच्या तपश्र्चर्या शक्तीचे बळ होते. त्यांनी पहिले की माझे वडील आईचा अपमान करीत आहेत. त्यांनी क्रूर नजरेने पित्याकडे पाहिले, पाहताच त्यांच्या वडिलांच्या शरीराचा रंग सुद्धा काळा झाला. घोडे चालण्याचे थांबले , रथ पुढे चालू शकला नाही, हैराण झालेल्या सूर्यदेवाने शिवाची आराधना सुरु केली, तेव्हा शिवाने सुर्याला सल्ला दिला की, तुमच्या कडून मुलगा व स्त्री दोघांचाही अपमान झाला. यामुळे दोष लागला. लगेच मग सूर्यदेवाने माफी मागितली. परिणामी पुन्हा सूर्यदेवाला सुंदर रूप प्राप्त झाले, व घोडे चालायला लागले. तेव्हापासून श्री शनिदेव वडिलांचे विद्रोही , शिवचे भक्त व माता यांना प्रिय आहे. जनमानसात असे समजतात की सूर्यमालेत जो शनि आहे, तोच श्री शनिदेवाचे प्रतिक आहे. शनिग्रह दगड व लोखंडापासून बनलेला आहे ज्याच्या वरती बर्फाचा थर व द्रवरूप हायड्रोजन मात्रा आहे. शनीचे तेजोवलय ६२००० की.मी. रुद्र व स्थूल रुपाने १०० मीटर आहे.
आपल्या दैनदिन जीवनात आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शनीचे प्रभुत्व आपल्यावर आहे. बाळाचा जन्म होताच कुटुंब सदस्यांना वाटते की, आई वडिलांच्या किंवा बाळाच्या राशीत शनि कसा आहे. ? कुठल्या पायाने मुलाचा जन्म झाला आहे. यावरून ही शनीच्या शुभाशुभ फळावरून चांगला – वाईट ची ओळख करतात. आपल्या शरीरात लोह तत्वाचा स्वामी शनि आहे. शनि कमजोर , दुर्लब झाल्यास शनीचा प्रकोप, शनिची पिडा यावरून शरीरात लोहाची कमतरता समजावी. लोह तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी व्यक्तीला दुर्बल ( कमजोर ), अशक्त करतात. आयहर – म्हणजे शरीरातील उर्जा शक्ती, आयहर- विना शरीरातील उर्जा समाप्त होते. ज्याचा शनि प्रबळ आहे त्याला लोह तत्वाची कमतरता भासत नाही.