माहिनीराज देवालय

श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पासून नेवास येथील हे मंदिर जवळ – जवळ २३ कि.मी. अंतरावर आहे. जगाचे जीवन सूत्र असलेले श्री मोहिनीराज ज्या ठिकाणी वास्तव्य करून आहे अशाच परिसरात ह.भ.प. बन्सीबाबांचा जन्म झाला आहे. नेवासा क्षेत्राच्या मध्यभागात श्री विष्णूंचे मोहिनीरूप धारण केलेले अतिसुंदर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. या मंदिराचा धार्मिक इतिहास भागवत पुराण काळात सापडतो. या संबधात भागवत ग्रंथातील ओवी मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे.

” जेथे चोरुनी घेता अमृत ग्रासा | निवटिला राहूचा घसा ||
तया कदंबावारी म्हाळसा | वास नेवासा पै केला || ”
यावरून पुराण काळातील समुद्र मंथनाच्या प्रसंगाचे ज्ञान होते. देव व दानव यांच्या समुद्र मंथानाच्या वेळेस जी चौदा रत्ने बाहेर पडली त्या मध्ये अमृतही होते. अमूर्ताचा वाटा देवांना द्यावा की दानवांना द्यावा यावरून देव – दानवात युद्ध सुरु झाले. हे भांडण मिटवण्यासाठी श्री विष्णु देवानी अती सुंदर असे मोहक स्त्रीच रूप धारण केले व अमृत कलश हातात घेवून देव – दानवांना अमृत वाटण्यासाठी पंक्तीत बसवायस सांगितले. मोहिनी रूपातील विष्णु देवांनी एकाच भांड्याचे दोन भाग करून देवांना अमृत व दानवांना मदिरा देण्यास सुरवात केली. विष्णुचे हे चातुर्य ओळखून राहू दानव रूप बदलून देवांच्या पंक्तीत जाऊन बसला. तो देवांनी ओळखला, अमृत प्राशानाच्या आतच सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्चेद केला. तो प्रसंग ह्याच श्री क्षेत्री घडलेला आहे. वरील ओवीतील म्हाळसा म्हणजेच मोहिनीराज होय.

हिंदुस्तानात श्री विष्णुदेवाचे मोहिनीरूपातील हे एकमात्र मंदिर होय. मूर्ती स्वयंभू अर्ध नारी – नटेश्वराची आहे. प्रस्तुत मंदिर सन १७७३ मध्ये श्री चंद्रचूड जहागीरादरांनी बांधलेले आहे. मधल्या काळात मोघलांनी सत्ता काबीज करून हे मंदिर लुटले व मूर्तीला प्रवरा नदीच्या प्रात्रात टाकून दिले. एका रात्री देवाने दृष्टांत दिला नदीतून पुनः या मूर्तीला बाहेर काढून सध्याच्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली. मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक चित्रकृती देवांचे फोटो आहेत. हया देवाचे वैशिष्ट्य असे की, महाराष्ट्रातील अनेक जाती धर्म संप्रदाय समाजाच्या लोकांचे हे कुलदैवत आहे.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा