श्री शनिदेवाच्या विशाल अनुकंपा मुळे जर आपण शनि शिंगणापूर मध्ये दर्शनास आलात अन् जि मूर्ती बघाल ती साधारण नसून जागृत स्वयंभू मूर्ती आहे. १६” ६” लांब व १६” ६” रुंद चौथऱ्यावर हे शनि महाराज कसे अवतीर्ण झालेत याची सुद्धा एक खरी कहाणी सांगतात.
आजपासून जवळ जवळ ३५० वर्षापूर्वी श्री शनिदेव हया गावात आले. त्यावेळी इथे छोटीशी वस्ती होती, २०-३० झोपड्या तेव्हा गावात असतील. आजच्या इतकी लोकसंख्या तेव्हा नव्हती , ना आजच्या सारख्या सुख सुविधा , रस्ते व वहाने. पूर्वी हया भागातफार गवत, झाडी , चिखल असायचा, जवळ पास विस्तीर्ण शेती होती. आज सरकार , गावकरी व श्री शनिदेवाच्या नावाने असलेल्या ट्रस्टच्या सहकार्याने खूप प्रगती दिसते.