परदेशातून व भारतातूनही अनेक भक्त लोक श्री शनिच्या दर्शनाला येत असतात. आपण कोणत्याही वाहनाने कुठपर्यंत येवून पुढे कसे यायचे या संदर्भातील संक्षिप्त विवेचन
सडकमार्ग
औरंगाबाद – अहमदनगर राज्यमार्ग क्र. ६० वर घोडेगाव येथे उतरल्यावर तेथून ५ की. मी. वर शनि शिंगणापूर किंवा मनमाड – अहमदनगर राज्यमार्ग क्र. १० वर राहुरीला उतरल्यावर तेथून ३२ की.मी. वर शनि शिंगणापूर तेथून बस – शटल सर्व्हिसने शनि शिंगणापूर येथे येता येते. तसेच शिरडी, राहुरी, घोडेगाव येथून जीप, बस, रिक्षा ऑटो सर्व्हीस उपलब्ध आहे.
रेल्वेमार्ग
भारताच्या काना कोप-यातून रेल्वेने शनि शिंगणापूरला येता येते. यासाठी रेल्वे स्टेशन अहमदनगर राहुरी श्रीरामपूर बेलापूर या रेल्वे स्टेशन पासून पुढे शनि शिंगणापूर येथे येण्या जाण्या करिता एस.टी.बस जीप टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत.
विमानमार्ग
परदेशातून मुंबईला उतरून किंवा राज्यातून औरंगाबाद, पुणे, मुंबई, उतरून पुढे शनि शिंगणापूर येथे येण्या- जाण्या करीता एस.टी.बस जीप टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत.