महिलांचे आभिमत

मी आत्तापर्यंत जेवढी पुस्तके श्री शनिदेवांच्या संदर्भात वाचली, तेव्हा असे लक्षात आले कि कोणत्याच ग्रंथात महिलांचा उल्लेख वा सेवा संदर्भ,अनुभव कथन नाही. त्यांना कुठे ही, कुणी वाव दिलेला आढळत नाही.मग माझ्यासह इतरांना असे वाटू शकते कि प्रस्तुत देवाच्या देस्थाना च्या संदर्भात महिलावार्गावर अन्याय तर झालेला नाही ना? कारण त्यांनाचौथा-यावर चढून दर्शनास बंदी आहे, किवा तर हि अनेक आडचणी त्यांच्या संदर्भात आहेत. म्हणून मी १३ ते १५ फेब्रुवारी २००४ रोजी ह्याच गावातील काही वयोवृद्ध स्त्रिया आजी, दादी, नाणी यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांना काही प्रश्न विचारले, त्या वेळी त्यांनी जे काही सागितले ते तसे च्या तसे तुमच्या पुढे कथन करीत आहे.

कै. बानकर भाऊ यांच्या धर्मपत्नी श्रीमती रुक्मिणीबाई यांना भेटावयास गेलो. त्यांना भाऊ बरोबर राहून श्री शनिदेवांच्या संदर्भातील काही जागृत अनुभव कथन करावयास सांगितले. ऐक्यांशी वर्ष वयाच्या रुक्मिणीबाईनि १५ फेब्रुवारी २००४ रोजी सांगितले कि ”मला व माझ्या कै. यजमानांना अनेक चमत्कारिक अनुभव प्रत्यक्ष पाहायला मिळाले. उदाहरणच द्यायचे झाले तर आमच्या घरातील जयश्री मुलीच्या पायातले पैजण चोरांनी हळूच काढले व नंतर सोन्याची चैन हि त्यांनी काढली. परंतु त्या झोपेतल्या मुलीला काही कळले नाही पण पहाटे तो चोर स्वत: परत आला अन पायातील पैजण व चैन परत टाकून तो पळाला

‘दुसर सांगायचे म्हणजे आमचं मोठं संयुक्त कुटुंब आहे. तुम्ही बघा घरात कुठे ही दरवाजा, कुलूप किल्ली नाही.घरात सर्व वस्तू उघड्यावर आहेत.शिवाय अंगणात उघड्या वर शेतीचा सर्व माल पडलेला आहे.तरी आजपर्यंत काहीही नुकसान झालेले नाही. मला २-३ सुना आहेत. पण आमच्या घरांतील स्त्रियांमध्ये किवा मुलींमध्ये कधीही आजपर्यंत भांडण वा संघर्ष नाही,मनोमन सुध्दा नाही. श्री शनिदेवाच्या कृपेनेच आम्ही सर्व कुटुंबीय सुखी व समाधानी आहोत.

शनी शिंगणापूर मधील प्रस्तुत देवालयाच्या जवळ राहणाऱ्या व गावातील सर्वात वयोवृद्ध स्त्री श्रीमती. विठाबाई यशवंत बोरुडे यांना भेटलो, ज्यांचे १०० वर्षाहून अधिक वय आहे. त्यांना १३ फेब्रुवारी २००४ रोजी भेटून थेट प्रश्न केला कि श्री शनिदेवाच्या भक्तीमध्ये पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांना दर्शनासाठी बरोबरीचे स्थान नाही, तसेच चौथा-यावर महिलांना जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही, हे एक प्रकारे महिलांवर अन्यायच आहे असे नाही का तुम्हाला वाटत ? विचारताच त्या शांतपणे डोक्यावर पदर घेवून बोलल्या :-

भाऊ रे, आमच्या मनामध्ये असलं काही वाटत नाही, कां आमची काही तक्रार पण नाही, आम्ही न लाजता मंदिरासमोर जातो न खालून दर्शन घेतो. आमच्या नव-यांनी किवा मुलांनी जरी चौथा-यावर जाऊन नमस्कार – दर्शन घेतलं,तर तो नमस्कार – दर्शन पण आमचाच असतो. त्यांनी नमस्कार केला म्हणजे तो आम्हीच केला. तेव्हा आमच्या मनात स्त्री – पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. चौथा-यावर जाऊन पाया पडले काय अन खालून पाया पडले काय, तेव्हा अश्य नमस्कार, भक्ती, श्रद्धा मध्ये काही अंतर नाही. भक्ती भाव मानसिक सुखावर आवलंबून आहे. म्हणून जरी आम्ही चौथर्यावर न जाता खाली दर्शन घेतल तरी त्यात आम्हाला चौथर्यावरून दर्शन घेतल्याचा आनंद, सुख आहे.

श्रीमती विठाबाईशी जेव्हा आजून काही विचारणा केली तेव्हा त्या म्हटल्या :-आमच्या संपूर्ण आयुष्यात आम्हाला कधी हि कुणाची भीती वाटली नाही. तुम्ही सुध्दा आमच्या गावात कुणाच्या हि घरी जा, तरी तुम्हाला कुणी रागावणार नाही कां बोलणार नाही. उलट आपला पाव्हना समजून तुमचे आदरातिथ्य करतील. आमच्या ह्या घरात पेटी नाही कां कुलूप कुठेही नाही. घरांत कोणतीच वस्तू आम्ही कुणापासून लपवत नाही. आमच्या घरातील कुणाचे हि सुनेशी,नणंद-भावजायींशी, आत्या-मावशीशी कुणाचे हि कुणाशी भांडण नाही. सर्वच गुण्या गोविंदाने व प्रेमाने, एकोप्याने नांदत आहेत.श्रीमती विठाबाई च्या घरी पण चोर आलेले होते. त्यांचे मटक्यात सोने व पैसे ठेवलेले होते, चोरांनी सर्व घर तपासले, तरी त्यांच्या हाती काही लागले नाही शेवटी ते चोर पळून गेले. पुढे त्या विठाबाईने सांगितले कि दोन चोरांनी मंदिराजवळच्या दोन सायकली चोरून पळाले. पण शेवटी ते फिरून रात्रीच्या वेळेला मंदिरा जवळच आलेत अन सायकली ठेऊन निघून गेले. तर मित्रहो आपण चार हि धाम फिरून आलात तरी असे गाव व देवस्थान तुम्हाला कुठेही पहावयास मिळणार नाही.

श्रीमती पार्वतीबाई दरंदले यांना मी पुन: दि.२२ फेब्रुवारी २००४ रोजी घरी भेटलो. तेव्हा त्यांनी १-१ अनुभव नम्रतेने व ताजे अनुभव सांगावयास सुरवात केली पण जेव्हा मी त्यांना चौथा-यावर महिलांना पाया पडून न देणे संदर्भात तुमचे काय मत असे विचारले तेव्हा त्या म्हणाल्या:-

”आम्हा महिलांना चौथा-यावर नमस्कार करू न देण्याची जरी सक्त ताकीद असली तरी त्याने आमच्यावर काही फरक पडत नाही. अहो देवाला आपण चौथा-यावरूनच काय दुरून जरी नमस्कार केला तरी तो पावतो. तेव्हा चौथा-याच्या वर – खाली असा भेदभाव ठेवायचाच कशाला ? हिंदीत मन आहे ना मन चंगा तो कथौट मे गंगा . तसं आहे . ह्याच विचाराने मी कधी – कधी घरूनच भक्तिभावाने नमस्कार करते अन दर्शनाने तृप्त होते.

मी गावात असे बघितले कि, संयुक्त परिवार असून सर्व हर्षित व प्रसन्न आहेत, कुणाची कुणाशी दुष्मनी नाही, मतभेद नाही. भाऊबंदकी, असूया, व्देश नाही. १०० वर्ष वयाच्या आजीने पण सांगितले कि आमच्या गावातील शेती-रानमळ्याच्या घरात सोने, पैसा आहे, सर्व उघड्यावर आहे तरी पण कधी चोरी झाली नाही.

पुण्याचे सी. आय. डी. इन्स्पेक्टर श्री प्रमोद होनराव गेल्या तीस वर्षापासून नियमित पणे श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात.
मुंबई हायकोर्टाचे जज्ज साहेब अनेक दिवसांपासून श्री शनीदेवाच्या दर्शनासाठी यायचे म्हणत होते, परंतु प्रतेक्ष कार्य वाढ ल्यामुळे त्यांचे जमत नव्हते. परंतु मागील वर्षी नेमकी त्यांची कार चोरीला गेली व ती चोरांनी शनी शिंगणापूर परिसरातच आणून सोडून पळून गेले. जज्ज साहेबांना जेव्हा माहिती मिळाली कि आपली गाडी चोरांनी शनी शिंगणापूर परिसरात सोडून पळाले. तेव्हा ते लगेच तिथे आले, गाडी ताब्यात घेतली अन लगेच श्री शनिदेवांच्या दर्शनाला आले. या निमित्ताने कां होईना जज्ज साहेबांना लवकरच दर्शनाला यावे लागले आर्थात ते यांचे सर्व श्रेय श्री शानिदेवालाच देऊन गेले.

वापी (गुजरात) च्या बँक ऑफ बरोडा मधील सेवारत श्री सुनीलकुमार सोलंकी यांच्या पत्नीचा अनुभव श्री शनिदेवा संदर्भात असाच चमत्कारिक आहे.सौ.वर्षाबेन असे म्हणतात कि त्यांच्या पतीला कॅन्सर झाला होता. शेवटी त्यांनी श्री शनिदेवाला वापिहून अनवाणी पायी शिंगणापूरला दर्शनासाठी प्रवास करण्याचा नवस केला. काय योग श्री सोलंकीच्या तब्येतीत फरक पडताच १९९६ पासून दरवर्षी वापी – शिंगणापूर ३०० कि.मी. चा प्रवास ते अद्याप करताहेत.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा