- इथे आतापर्यंत एक हि सरकारी कार्यालय नाही, कारण सरकारी कार्यालय म्हटले कि दरवाजा आला, कुलूप, किल्ली आले.तरीही येथे युको बँकेची शाखा आहे
- संपूर्ण गाव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे – मराठा लोक आहेत, जे एकाच कुळाचे, एकाच जातीचे, एकाच धर्माचे, एकाच धर्माचे, एकच वंश परिवाराचे आहेत.
- दररोज येथील देवस्थान व अन्य व्यवहार एक लाखांपर्यंत असतो.
- गावातील सर्व आबालवृध्द शनिवारी उपवास करतात. तसेच कुटुंबातील कोणतेही शुभकार्य शनिवारीच सुरु करतात.
- दक्षिण भारत, उत्तर भारत व परदेशातील सर्व शनी भक्त इथे नतमस्तक होतात.
- महंत उदासी बाबाच्या काळात शनी दर्शनासाठी फ़क़्त तीनच लोक दगडू चंगेडिया बद्री टोकसे यांची आई येत ,हे पण फ़क़्त शनिवारी येत. आज दररोज सुमारे १३००० लोक येतात.
- श्री शनिदेवाला अमाप तेल वाहिले जाते, कधी १०१ डब्बे , तर कधी शेकडो लिटर तसेच इच्छेप्रमाणे तेल वाहिले जाते.
- श्री शनी जयंती, शनी आमावस्येला भरणाऱ्या यात्रेत १० लाख भक्त गण येतात.
- इथे अट्टल गुन्हेगार, चोर, डाकू, मांसाहारी, दारुड्या, दोन नंबरची लोक सहसा येतच नाही, जरी आले तरी सज्जना सारखेच येतात व जातात असे अनुभव सांगितले नाशिक रोडच्या जेल रोड परिसरात राहणाऱ्या मोहर्सिंग मोह्बिया यांनी.
- येथील नागरिकांचे जसे घराचे दरवाजे उघडे असतात तसे मनाचे ही दरवाजे उघडे असतात.