शनी शिंगणापूर गावा संदर्भात

प्रस्तुत गावात येण्याकरिता दोन्हीकडून डांबरी पक्की सडक असल्यामुळे दुरून येणाऱ्या बसेस,कर,जीप,ट्रक,ट्रक्सी, आटोरिक्षा ने लोकांचे आगमन व निगर्मान होत असते. इथे येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळीचे ते उत्तम स्वागत करून आदरतिथ्य करीत असतात हे अनुभवाने सांगतो.

संतांची कर्मभूमी असलेल्या ह्या गावात श्री शनिदेवच स्वामी,मालक,अधिपती सर्व काही आहे.इथे असे म्हणतात कि आपण जशी कृती – कर्म करू तसे फळ तत्काळ श्री शनिदेव देतो.अशा या जग प्रसिध्द गावात दरवाजा,खिडकी,साखळ दंड,कडी,कोयंडा, कपाट,बॉक्स,पेटी,कुलूप,किल्ली वगैरे चा काहीही उपयोग व प्रयोग कुणीही करत नाही.कारण आसं म्हणतात कि हा श्री शानिदेवा चाच आदेश आहे कुलूप लावू नका.आणि गावातील लोकच सांगतात कि आमच्या घराचे रक्षण करणे हे श्री शनिदेवाच्या अधिकारातील आहे.ते असे मानतात कि श्री शनिदेव स्वत: त्यांना सांगतो.

” मी २४ तास तुमच्या घराचे,शेतीचे,मालाचे रक्षण करीन,तुम्ही निश्चिंत रहा,कुठलीही काळजी करू नका अन तुम्हाला हि काही होणार नाही,तुमचे रक्षण हे माझे कर्तव्य होय.”

म्हणूनच जगभर ह्या गावाचा उल्लेख होतो.तसे इतरत्र पहिले तर जगभर चोऱ्या होताहेत.कंपाउंड वर कुलूप,कुलूपवार कुलूप लावून सुध्दा चोर आरामात चोरी करून फरार होतो.पण शिंगणापूर मध्ये उलट चित्र आहे.सर्व उघडयावर, खुले आहे तरी चोरी होत नाही.कोणी चोरी करण्याचा प्रेयतन जरी केला तरी तो त्यात यशस्वी होत नाही.प्रस्तुत साक्षात्कार संपूर्ण गाव अनेक पिढ्यांपासून पहात आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या संदर्भात मी ह्या गावात गेलो,काही जुन्या लोकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो,काही गल्लीमध्ये फिरलो, शेतात गेलो,शेतातील घरात,मळ्यात गेलो आणि पाहून थक्क,आश्चर्यचकित झालो कि सर्वच आबालवृध्द हर्ष उल्हासात आपल्या घरात सुखाने संसार करीत होते.आपल्या सन,उत्सवामध्ये सर्वच गुंग होते.इथे जे काही घडते ते सर्व श्री शनिदेवाच्या विश्वासाने, सहकार्याने,आशीर्वादाने संपन्न होते.गावात जर कुणाचे नुकसान झाले,कुणाला इजा झाली तर ते श्री शनिदेवाची शिक्षा समजतात. अहो एवढंच कशाला ह्या देवस्थानच्या जवळून जर कुणी एखादी वस्तू चुकून का होईना उचलून आपल्या बरोबर गावी नेली तर तिथे शनी भगवानचा चमत्कार दिसतो. ह्या चमत्काराबरोबर घाबरून ती व्यक्ती आपल्याबरोबर नेलेली वस्तू उदा.चादर,रुमाल,पंचा, फोटो,पिशवी तो लगेच परत करायला येतो किवा पोस्टाने पाठवितो,नाहीतर कोरियर सेवाने पाठवितो.त्या नंतर त्या व्यक्तीस खरोखर आराम मिळतो.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा