श्री | शनी शिंगणापूर मध्ये अदभुत चमत्कार : चतु:सूत्री !
”देव आहे, पण देऊळ नाही !
घरे आहेत, पण दरवाजे नाही !
वृक्ष आहे, पण छाया नाही !
भय आहे, पण शत्रू नाही !”देव आहे, पण देऊळ नाही
शनी शिंगणापूरचे श्री शनिदेव इतके महान आहेत कि ते कुणाच्या छत्रछायेत राहू इच्छित नाही. सज्जनांचे रक्षण व दृष्टांचे निर्दा लन करण्यासाठी सृष्टीकार्त्याने पृथ्वीतलावर दहा अवतार धारण केलेत.आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कि काय श्री शानिदेवाने आपले रूप या ठिकाणी प्रकट केले आहे.श्री शानिदेवाना कुणाचे अधिपत्याखाली रहाणे पसंद नव्हते व नाही त्याचाच प्रत्यय कि काय श्री शनिदेव शिंगणापूर येथे अष्टोप्रहर उन,वारा,पाऊस,थंडी,तीनही ऋतूत मस्तकावर कोणतेही छत्र धारण न करता आज अनेक वर्षापासून उभे आहेत.तसे पहिले तर मूर्तीवर अनेकांनी भारतीय परंपरे प्रमाणे छत्र बांधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! ज्यांनी-ज्यांनी मंदिर व अन्य बांधण्याचा प्रयत्न केला त्या-त्या वेळी त्यांच्याच स्वप्नात द्रुष्टांत मिळत असे.
” मला निवारा किवां कुणाच्या छत्रछायेची गरज नाही ”.
प्रस्तुत जागी जागृत श्री शनिदेव आहेत, परंतु देवस्थानची शोभा वाढविणारे त्यावर मंदिर नाही श्री शनिदेव बिना देऊळाचे उघड्या पटा’गणावरच उभे आहेत.म्हणूनच सर्व भारतातील जनता म्हणते कि ”देव आहे पण देऊळ नाही”देऊळ नाही, म्हणून दरवाजा नाही,दरवाजा नाही म्हणूनच भक्तांसाठी २४ तास दर्शनासाठी खुले आहे.माझ्या विचाराने हे असे भारतातील एकमेव देवस्थान असावे जिथे देव आहे पण देऊळ नाही.मला वाटत भक्तांना त्वरित दर्शन देण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या रक्षणासाठी कुल्या पटा’गणात देव आहे.म्हणून म्हणतात देव आहे पण देऊळ नाही.
घरे आहेत, पण दरवाजे नाहीत
घर आपल्या सुख समृद्धीसाठी अत्यावश्यक असते. म्हणून घराला दरवाजा लावून,कडी लावून आपण त्यात आरामात राहतो झोपतो किवा खाजगी कामासाठी दरवाजा आतून लावतो.परंतु शनी शिंगणापूर मध्ये घरे आहेत मात्र तिथे दरवाजेच नाही. जगाच्या पाठीवर शनी शिंगणापूर सारखे गाव कुठेच सापडणार नाही. तिथे दरवाजा लावतच नाही त्यामुळे त्याला कडी कोयंडा लावून कुलूप लावणे तर दूरच. येथील लोकांच्या घरातील सामान असो का शेतातील,सर्वच खुले असते.अशी श्री शनिदेव महाराजांची सक्त आज्ञा आहे. तरी सुध्दा जर कोणी या वस्तूचा (दरवाजा,कुलूप) चुकून आथवा नजर चुकीने वापर केला गेला असेल तर त्याची समज पण तिथे भक्ताला मिळते. शनी शिंगनापुर परिसरात इमारतीला लाकडी चौकटी,खिडक्यांना झडपा नाहीत. कुत्रे,मांजर यांच्या पासून रक्षण करण्याकरिता घराला ताटी किवा पडदा लावतात. प्रस्तुत गाव हे खेडे असून येथील लोकं सधन शेतकरी आहेत. येथील बहुतेक घरे उत्तम आधुनिक प्रकारची सिमेंट कॉक्रिट ने बांधलेली आहेत तरी घराला चौकटी नाहीत.अन जर कोणी चौकटी लावण्याचा प्रयत्न केला तर, त्याला यश आले नाही,म्हणूनच म्हणतात ”घरे आहेत पण दरवाजा नाही”आदर्श घराची सर्व वैशिष्ठे प्रस्तुत गावात आहेत आर्थात हि सर्व शनी देवाची कृपा आहे.
वृक्ष आहे,पण छाया नाही.
श्री शनी मूर्तीच्या चौथर्याच्या उत्तर दिशेला फार जुने कडू लिंबाचे झाड होते.या लिंबाच्या झाडाच्या फांदी वाढून सूर्य मध्यान्ही आल्यानंतर जर त्या फांदीची सावली मूर्तीवर पडली तर ती फांदी तुटून आपोआपच बाजूला पडत असे.प्रस्तुत फांदी तुटतांना कोणताही अपघात किवा कुणाला इजा झाल्याचे ऐकवीत नाही.या लिंबाच्या झाडाची छाया श्री शनीदेवावर कधीच पडली नाही म्हणूनच असे म्हणतात कि, ”वृक्ष आहे पण छाया नाही” श्री शनीदेवांचा चमत्कार जर ऐकवयाचा असेल तर त्याच लिंबाच्या झाडावर सुमारे ३० वर्षापूर्वी वीज पडली होती. जेव्हा वीज पडली त्यावेळी तिथे लग्नाचे वऱ्हाड उतरलेले होते.परंतु कुणासही बाधा झाली नाही.विजेच्या स्पर्शाने त्या कडू लिंबाला आग लागून पूर्ण झाड जळाले.अनेकांनी प्रयत्न केल्यावर ते झाड विझवले पण काय चमत्कार दुसऱ्या दिवसी ते झाड पुन: हिरवेगार दिसायला लागले. प्रस्तुत दैवी चमत्कार हा श्री शानिदेवांचाच होता असेच ह्या भागात म्हणतात. प्रस्तुत झाड १२ वर्षापूर्वीच तोडले गेले. परंतु काय चमत्कार, ज्या ठिकाणी लिंबाचे झाड होते त्याच जागेवर पुन: एक पिंपळाचे झाड सध्या दिसत असून ते सुद्धा खूप मोठे झालेले दिसून येते. तेव्हा आपण इथे आलात म्हणजे आवश्य बघा ”वृक्ष आहे पण छाया नाही”.
भय आहे पण शत्रू नाही
आपल्या जन्म – जन्मांतर, युग – युगांतर पापाच्या भोगासाठी आपण पारायण केले पाहिजे. केवळ भयापोटी लोक श्री शनिदेवाची मूर्ती, फोटो किवां अन्य काही वस्तूं घरात ठेवत नाही. स्वत:च्या कृतीमुळे, करणीने जर वाईट झाले तर त्याचा दोष श्री शनीदेवावर सोडण्याची एक परंपरा समाजात वाढत चालली आहे. परंतु प्रत्यक्षात वाईट कर्मामुळे आपल्या हृदयात शनी बद्दल भय आहे , परंतु तो आपला शत्रू नाही. भय शत्रू बद्दल असते. शत्रू कधी आपले कल्याण करीत नाही. पण शनी तर भक्तांचे कल्याण करीत असतो. म्हणून हे खूपच विस्मयकारी, विचित्र आहे कि आपल्याला भीती आहे. जर वाईट कर्म केले असेल तर तो आपल्याला शत्रू वाटणे स्वाभाविक आहे. पुढे शनी शिंगणापुरचे ग्रामस्त, ट्रस्टी व अनेक भक्तांच्या अनुभवांच्या आधारे हे सिध्द होते कि शनी आपला शत्रू नसून तो मित्रच आहे. प्रसंगी प्रताडीत करून योग्य मार्गावर आणणाऱ्या गुरूप्रमाणे मार्गदर्शक आहे.