सत्यकथा

मित्रहो मला प्रस्तुत ग्रंथात एक सत्यकथा आवर्जून सांगावीशी वाटते. आता पर्यंत आपण श्री शनैश्वर देवाच्या अनेक कथा चमत्कार साक्षात्कार पाहिला किवा ऐकला असेल पण जुलै १९७८ मधील हि सत्यकथा मनाला संस्पर्श करून जाते. मी १३ मे २००६ रोजी शनी शिंगणापूर मधील श्री शनिदेवांच्या संदर्भातील काही जिवंत अनुभव घेण्यासाठी श्री धोडीराम तुकाराम दरंदले यांच्या मळ्यात प्रा. शिवाजीराव दरंदले यांच्या बरोबर गेलो असता सौ.चंद्रभागाबाई धोडीराम दरंदले यांनी जी मला सत्यकथा सागितली तर ती ऐकावे ते नवलच.

सौ.चंद्रभागाबाई श्री शनि देवाचे महात्म्य कथन करताना गहिवरून गेल्या होत्या.अन बोलता बोलता त्या सहज सत्यकथा सांगू लागल्या कि ,’ माझी त्या वेळी नुकतेच लग्न झालेली किराळे शिंगवे ता. पाथर्डी ची मुलगी सौ.साखरबाई एक मूळ करून माहेरी आलेली होती. नुकतेच लग्न झाल्यामुळे तिच्या अंगावर सासरच्या लोकांनी सर्व दागिने घालून दिले होते.ती तसीच माहेरी आल्यावर स्त्री सुलभ सर्व दागिन्यांनी सुंदर दिसत होती. त्या दिवशी दुपारी आमच्या वस्तीवर ४ अज्ञात मंडळी भिक्षेसाठी घराजवळ आली आणि भिक्षेचे नाव करून त्यांनी माझ्या व सौ साखराबाईच्या अंगावरील दागिने पाहून त्यांच्या मनात ह्या दागिन्यांचा मोह झाला.आमच्या मनात काहीच संकेची पाल चुकचुकली नाही परंतु त्यांच्या मनात भिक्षे बरोबर दागिने चोरण्याची कुबुद्धी झाली.

झाले ! त्याच रात्री त्या चारही अज्ञात भिक्षेकरी मंडळीनी एक दीड च्या सुमारात वस्तीत पूर्वनियोजन कटाने प्रवेश केला हे मी, माझी मुलगी व घरातील मंडळींनी सर्व पहिले. त्याच क्षणी त्यांनी आमच्या जवळ दागिन्यांची मागणी केली शंका खरी ठरली आम्ही थोडे ओरडलो काही संघर्ष बोलचाल झाली. अशा घाबरलेल्या अवस्थेत अचानक काय श्री शानिदेवाने बुद्धी दिली कि आमच्या घरापासून शंभर मीटरवर असलेले श्री. आण्णासाहेब कुशीनाथ दरंदले यांच्या घराकडे मी व माझी मुलगी त्या चोरा समक्ष निघून गेलोत.

काय चमत्कार आम्ही ज्या चोरासमक्ष निघून गेलो ते आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होतो.परंतु आम्ही ज्या चोरासमक्ष आन्नासाहेबांच्या घराकडे गेलो त्या चोरांना मात्र आम्ही दिसत नव्हतो. वास्तविक त्यांचे डोळे उघडे होते. याचा शब्दश: अर्थ ते आंधळे झाले नव्हते परंतु प्रत्यक्ष श्री शनिदेवाच्या कृपेने आमच्या रक्षणासाठी दागिन्यासाठी त्या चोरांच्या डोळ्यावर भुरळ पडली होती. ते त्या काळापर्यंत दृष्टिहीन झाले होते. आम्हाला मात्र सर्व चक्षुव्रेमसत्यम दिसत होते. तेव्हापासून माझी पक्की खात्री झाली आहे कि श्री शनिदेवाची शक्ती महात्म्य सत्य असून आदभूत आहे.

हा सत्यद्रूष्टांत सौ. चंद्रभागाबाईंनी विद्यमान विश्वस्त श्री. साहेबराव तुकाराम दरंदले यांच्या समक्ष घडल्याचे साक्षात सांगितले. त्यांची शनी देवावरील हि अटळ श्रध्दा शक्ती व चमत्कार पाहूनच कि काय हे कुटुंब दररोज श्री शनी देवाची भक्ती करीत आहे

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा