श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा नगरीचे स्वामी निर्वाणादास उदासीन चे डॉ. बिंदुजी महाराज यांनी कथन केले आहे की :-
‘श्री भगवान श्री शनिदेव का यह मंदिर उदासीन संप्रदाय के महापुरुष द्वारा सुचारू रुपसे चलती हें तथा आतिथ्य सेवा होती हें.
अशाच प्रकारे दुसरी कुंभमेळा नगरी प्रयाग कीटगंज चे महंत महेश्वरदास उदासीन श्री पंच रामेश्वर जमात यांनी इथे येऊन दर्शन घेतल्यावर सत्कार प्रसंगी म्हटले की :- ” यह अदभूत परंपरा के कारण दर्शनीय स्थळ हें. वही धार्मिक निष्ठा और हिंदू वैदिक सनातन धर्म का अदभूत नजारा प्रस्तुत करता हें! भगवा वस्त्र, कटी वस्त्र धारण कर प्रभू दर्शन श्रेष्ठ परंपरा का प्रतिक हें! श्री शनी महाराज के दर्शन कर अभिषेक कर बीज मंदिर के दर्शन कर धन्य हुआ ! स्थान अति सुंदर मोहक तथा शक्तिशाली हें. व्यवस्था उत्तम तथा सुंदर हें !
सोनई गावचे दुसरे एक उदाहरण असेच बोलके आहे. येथील एका बाबाला कुष्ठरोग – रंगतपिती झाला होता, तरी तो रोज पायी पायी श्री शनिदेवाच्या दर्शनाला यायचा. आज त्याची तब्येत उत्तम झाली असून याचे श्रेंय तो श्री शनिदेवाच्या भक्तीला देतो. शेजारी असलेल्या राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एक मुलगा आहे, ज्याला अर्धाग्वायू झालेला होता, तरी तो रोज दर्शनाला यायचा. आज तो सुद्धा उत्तम फिरतो , चालतो तो सुध्दा श्री शनिदेवाचा कृपा प्रसाद मानत असतो. असे एकक नव्हे शंभराहून अधीक उदाहरणे तुम्हाला श्री शनिदेवाच्या कृपेचे सांगता येतील.
थोडक्यात श्री शनिदेवाचे महात्म्य, वैभव, चमत्कार, यश कीर्ती अशी सांगितली जाते :-
- जीवनातील आनंदाच्या श्रणी सुध्दा श्री शनिदेवाची प्रशंसा करा.
- संकट काळात सुध्दा श्री शनिदेवाचे दर्शन घ्या.
- कठीण व पीडा – वेदनादायक प्रसंगी सुध्दा श्री शनिदेवाची पूजा करा.
- दु :खद प्रसंगी सुध्दा श्री शनीदेवावर विश्वास ठेवा.
- जीवनाच्या प्रत्येक श्रणी श्री शनिदेवाच्या चरणी कृतज्ञता प्रकट करून लीन व्हा.
वरील पंचसुत्रात श्री घुले साहेबांनी आपले मानवी जीवन त्याच प्रमाणे श्री शनिदेव यांच्यातील नाते संबंधावर परस्पर पूरक व अन्योन्य संबंधावर प्रकाश टाकलेला आहे.
प्रस्तुत ग्रंथात आम्ही एका ठिकाणी श्री शनिदेवाला न्यायमूर्ती संबोधन केलेले आहे. त्या अनुषगांचे एक प्रसंग प्रतेक्षात गुजरात मध्ये घडलेले आहे. गुजरात मधील गांधीनगर जवळील रुपल खेड्यातील तो प्रसंग आहे. रुपाल ला पालीचा वार्षिक महोत्सव सम्पन्न होतो, ज्यात एकाच वेळी २५००० कीलो तूप उत्सवात देवाला समर्पित केले जाते, जे भारतातील एक रेकॉर्ड आहे. दुस-या दिवशी हेच तूप रस्त्यावर फेकले जाते. नंतर गरीब लोक हयाच रस्त्यावरील तुपाला उचलून घरी आणतात व आपल्या स्वयंपाकात वापरतात. हया घटनेच्या आधारे एका सामान्य नागरिकाने अहमदाबाद हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली . त्याचा निकाल नुकताच म्हणजे १ ऑक्टोबर २००३ रोजी अहमदाबाद हायकोर्टाच्या जज्ज ने घोषित केला की :- ” ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर देवस्थानाने श्री शनिदेवावर भक्तांनी वाहिलेले हजारो लिटर तेल एकत्र करून ते साबाण बनविणा रया कारखान्याला टेंडरने विकून बदल्यात देवस्थान ३० लाख रुपयांचे विकास कार्य भक्तांसाठी करते त्याप्रमाणे येथील २७ खेडयातून एकत्र केलेले २५००० किलो तुपाचे सुद्धा रस्त्यात दुसरया दिवशी न टाकता त्या तुपाचे सुद्धा जनहिताय प्रयोग आमलात आणावा असे सुचविले”.
हिन्दी रामभक्ती काव्याचे शिरोमणी श्री संत गोस्वामी तुलसीदास यांनी आपल्या रामचरित मानस महाकाव्यात त्रेता युगातील रामराज्य संदर्भात जे सूंदर वर्णन केले आहे , मला वाटतं ते आज सुद्धा जसेच्या तसे शनी शिंगणापूरला लागू पडते. ” लौकिक समृद्धी एव अलौकिक सुख की पूर्ण समरसता है | संपूर्ण अयोध्य नगरी रतनजतीत महलों से भरी है | घर घर में मणी | दीप शोभा पा रहै है | यहाँ न कोई दारिद्र है, न दुखी और न दीन है | चारों ओर सुन्दरता एवं पवित्रता का साम्राज्य है | सभी अयोध्या वासी स्वस्थ और सूंदर है | रंग – बिरंगी पुष्पवाटिकाएं , उदयान एवं राजमार्ग नगर को स्वर्ग तुल्य बना रहे है | “