शिते लावणे

अहमदनगर जिल्हा हा पर्जन्य छायेतील पट्टा असून सतत दुष्काळास तोंड द्यावे लागते. एक दोन वर्षा नंतर आवर्षण किवा पाऊस हि ओरड जिल्ह्यात कुठे ना कुठे सतत ऐकवयास मिळते.शनी शिंगणापूर परिसरात योग्य वेळी पाऊस पडला नाही तर ”पुनर्वसु” नक्षत्रापर्यंत पावसाची वाट पाहतात, जर पाऊस पडला नाही तर या परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी येऊन देवाचा कौल विचारात घेतात. पाऊस पडेल किवा नाही हे ह्या कौलाद्वारे सांगण्यात येते. या विधीस” देवास साकडे घालणे ” म्हणजेच ” शिते लावणे ” म्हणतात. आत्तापर्यंत ज्या ज्या वेळी कौल लावण्यात आला तो तो कौल खरा ठरला.

कौल किवा शिते लावण्याची प्रक्रिया

शिते लावण्यासाठी शनिवार ची निवड करतात. त्या दिवशी श्री शनी देवाचे सर्व प्रांगण झाडून स्वच्छ करतात व सडा टाकून रांगोळी घालतात.
चौथ-या समोर चा मठ धुवून स्वच्छ करतात. श्री शनिदेवाला गंगोदक व पंचामृताने अभिषेक घालतात. नंतर शनी शिंगणापुरचे रहिवाशी असलेल्या व नात्याने सख्खे मामा-भाचा यांना निराहार (उपवास) धरायला लावतात व गावातील वयोवृद्ध इसम जो नक्षत्रांची नावे विचारतो त्याला देखील उपवास करावा लागतो.

प्रस्तुत विधी पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय ताटकळत उभा असतो. पटांगनात जमलेल्या लोकांपैकी कुनाजवळ हि छत्री, काळी टोपी किवा कमरेला कातडी कमर पट्टा नसावा.नंतर सर्व जनसमुदायाच्या अंगावर गौमुत्र शिंपडतात. ज्या दिवशी शिते लावावयाची असतील त्या दिवशी महिलांना श्री शनिदेवाच्या प्रांगणात येऊ दिले जात नाही. चौथरा व मठ धुवून काढल्या पासून शिते लावण्याचा कार्यक्रम पार पडे पर्यंत

 

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा