महत्त्वाची माहिती

 • आपले आगमन होताच मार्गदर्शनासाठी देवस्थानचे स्वागत कक्ष २४ तास उगडे असते.
 • हे देवस्थान श्री शनी दर्शनासाठी २४ तास उगडे असते.
 • आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर पूजेसाठी ५० – १०० रुपयांची पूजा समर्ग्री घेवू शकता , अन्यथा आपले दोन हात , व तिसरे मस्तकाने दर्शन पर्याप्त आहे. येथे कोणत्याही प्रकारची पूजा-अर्चा करण्याची सक्ती नाही.
 • आपल्यालाला मुक्काम करावयाचा असल्यास निवासाची स्वतंत्र भक्त निवासस्थानात सोय आहे. चौकशी करून समाधान झाले तरच भाडयाने खोली घ्या. वाहनासाठी पार्किंग व्यवस्था उत्तम व सुरक्षित आहे.
 • श्री शनिदर्शन व प्रसाद – भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.
  प्रसादालायाची वेळ – सकाळी १० ते ०३
  सायंकाळी श्री शनिदेवाच्या आरतीनंतर ते ०९
 • अभिषेकासाठी इथे कमीत कमी ११ रु. दिले तरी चालते.
 • श्री शनिदेवाची सार्वजनिक महाआरती प्रात:काल ०४.३० वाजता व सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला होते.
 • धर्मकार्यासाठी देवस्थानच्या कार्यालयातच चौकशी करूनच पैशांचा व्यवहार करावा , व लगेच तेवढया रकमेची पावती घ्यावी. अन्यत्र कुठेही असा व्यवहार करू नये. आणि कुठेही दान करू नये
 • देणगी अथवा गुप्तदान या साठी मंदिर परिसरात दक्षिणा पेटी हुंडीची देणगीकक्षाची व्यवस्था केलीली आहे.
 • श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा च्या वतीने भक्तांच्या आरोग्यासाठी श्री शनैश्वर ग्रामीण रुग्णालय / दवाखाना उपलब्ध आहे.
 • सर्व भाविक भक्तांनी (स्त्री – पुरुष ) चौथऱ्यावर  समोरून श्री शनिदेवाचे दर्शन घ्यावे.
 • स्नान कक्षामधून बाहेर पडल्यावर अपापल्या मौल्यवान वस्तू घडयाळ, चैन इ. आठवण ठेवून बरोबर न्यावीत.
 • भक्तांच्या सूचनांचे सतत स्वागतच असते, अथवा जर कुणाला काही तक्रार करायची असल्यास, ती लेखी स्वरुपात पूर्ण नाव, पत्ता पिनकोड सहित द्यावीत. म्हणजे तीची दखल घेतल्यावर आपणांस कळविण्यात येते.
 • जर एखाद्या भक्ताला पोस्टाने देणगी द्यावयाची असेल तर लिफाफ्यात रोख स्वरुपात ( पाकिटात ) नसावे. त्या ऐवजी देवस्थानच्या नावाने मनी ओर्डर, क्रॉस चेक , डिमांड ड्राफ्ट , पोस्टल ओर्डर स्वरुपात असावे
 • श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा कडून प्रकाशित पुस्तके , श्री शानिदेवांचे फोटो , कॅसेट अथवा प्रसाद नाममात्र रुपयात स्वागत कक्षाजवळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
 • श्री शनिदेवा संदर्भात एखाद्या भक्ताला जर काही प्रश्न विचारायचे असतील वा काही शंका , जिज्ञासा असेल त्यांनी कार्यालयातच विचारावे, बाहेर कुणाजवळ ही विचारून अनावश्यक चर्चा करू नये.
 • मार्गदर्शक किंवा गाईड नाव धारण करून काही अपरिचित लोक पार्किंग मैदानात तुम्हाला भेटतील. तुमच्याशी गोड – गोड बोलतील. कृपया तुम्ही त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. त्यांच्यावर विश्वाश ठेवू नका . त्यांच्याकडून काही पूजा सामग्री खरेदी करून काही नुकसान झाल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असाल देवस्थान नाही. आपणास काही माहिती हवी असल्यास सरळ प्रशासकीय कार्यालाशी संपर्क साधावा.
 • श्री शनिदेवाचे हे एकमात्र देवस्थान आहे. आमचे इतरत्र कुठेही देवालय वा शाखा नाहीत. श्री क्षेत्र पंढरपूर येथे एक मठ आहे.
 • श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा जि. अहमदनगरला देणगी आयकर साठी ८० जी प्रमाणपत्र इथे उपलब्ध आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी ३५ एकर मंजूर आहे
 • महाद्वार समोरच नारळ फोडण्याची व्यवस्था आहे, अन्यत्र नाही.
 • श्री शनिदेव दर्शनसाठी अंघोळ करून ओला पंचधारी पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांग दर्शन रेलिंग व्यवस्था आहे आणि साधारण कपडे घातलेल्या पुरुष भक्तांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रेलिंग व्यवस्था आहे. संबंधीत भक्तांनी त्याच रेलिंग व्यवस्थेचा वापर करावा.
 • पूजा अर्चा , अभिषेक , सत्यनारायण , अन्नदान , भंडारा इ. सेवा उपलब्ध आहे.
 • श्री शनैश्वर मंदिर प्रांगणात जर एखाद्या कलाकाराला आपली कला श्री शनी देवाला समर्प्रीत करावयाची असेल , कला दाखवायची असेल अथवा कलेची हाजिरी भरावाची असेल किंवा कुणाला अन्नदान – भंडारा सारखे कार्य करावयाचे असेल तर त्यासाठी अगोदर त्यांनी देवस्थान प्रशासकीय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
 • देणगी पाठवण्यासाठी व पत्र व्यवहारासाठी पत्ता

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा