भूमिका

समस्त मानवच्या जीवनात सुख दुख भरपूर प्रमाणात आहे. जे अतिशय गुंतागुंतीत रह्स्मय बनलेले आहे. सृष्टीच्या चराचर बंधनात म्हणून ज्योतिश शास्त्र व अध्यात्माचे वेगळे महत्व आहे. एकविसाव्या शतकातील कॉम्पुटर व इंटरनेट च्या युगात भारतीय ज्योतीष्चार्याने जे काही सांगितले त्याचे प्रयोग पाश्चिमात्य राष्ट्रात सम्पन होत आहे. आज अमेरिकेत भारतीय अध्यात्म व ज्योतिषशास्त्राची खूपच मागणी आहे. ह्या धावपळीच्या युगात मानवाला शांती मिळत नाही. आज आपले जीवन भौतिक दृष्ट्या समृद्ध असून सुद्धा रोगराई, अपघात, कलह, तणाव, शंका-संशय, अन्याय, अत्याचार, भानगडी इत्यादींनी भरलेले आहे. आपल्या चहूबाजूंनी हा: हाकार, आक्रोश ऐकू येतो. या सर्वाला कंटाळून मनुष्य शेवटी श्री शनिदेवाच्या संपर्कात जाण्याचा प्रयत्न करतो, असे का?

श्री शनिदेवाच्या संदर्भात आपल्या भारतात ज्या प्रमाणे पौराणिक आख्यान प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे युरोपीय साहित्यात सुध्दा श्री शनिदेवाच्या विविध कथा वाचाव्यास मिळतात. इटली मध्ये शनीला “(saturn) देवता असे संबोधन आहे व त्याची पूजा केली जाते. प्राचीन आणि अर्वाचीन रोमक प्रस्तुत सेटन व शनीला ग्रीस लोक पौराणिक देवता ” क्रोणस” (Cronus) असे म्हणतात. सेटन अथवा क्रोणस च्या बाबतीत परदेशात पुष्कळ कथा, चमत्कार ऐकायला व वाचायला मिळते. आपल्या सारखीच परिस्थिती तिथे सुध्दा आहे म्हणूनच “वसुधेव कुटुम्बकम” शब्द सार्थक आहे.

जसजशी भौतिक साधन समृद्धी वाढली, तस तसा जीवनात ताण तनाव वाढत गेला.आपले कर्म जितके कुशल असेल तितकीच उत्तम फलप्राप्ती होते. हे शाश्वत सत्य आहे की आपले शरीर पंच महाभूतांनी बनलेले आहे. अन यांचा (पंच महाभूत) परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, हेच ग्रह आपल्यावर नियंत्रण करीत असतात. श्री शनिदेवाच्या विशाल अनुकश्पामुळे मला स्वयंभू श्री शनिदेवाचे दर्शन अनेक वेळा लाभले. मी स्वत: शनी देवाचा भक्त आहे. त्यांची पूजा – अर्चा उपवास – व्रत नियमित करतो, फलस्वरूप त्यांच्या कृपेने लिहण्याचा आदेश मिळाला अन बघता बघता लेखन संपन्न झाले.

प्रस्तुत ग्रंथात श्री शनिदेव कथा, श्री शनिदेवाचा इतिहास, शिंगणापूर चे जगातील स्थान कोठ? स्वयंभू मूर्ती, श्री शनिदेवाची चतु : सूत्री, साडेसाती व त्यावरील उपाय, श्री शनिदेवाच्या वैशिष्ठ्य, शनी पूजा का करतात. शनिस्तवन, उपासना देवता, श्री शनिदेवाचे उत्सव व सण, आश्चर्यकारक देवालय, कोल लावणे, शनि शिंगणापूर चे महत्व, जागतिक वैशिषटये, उदासी बाबा, स्व. श्री बानकर भाऊ, इतर देवस्थान तसेच शनि भक्तांसाठी महत्वाचे सूचना यात अंतर्भूत आहेत. कृपया वाचा, अनुभव घ्या अन पत्रोत्तराने कळवा. मी वाट पाहत आहे.

									                  	     	Prof. Dr. Bapu Rao Desai.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा