आसपासचे देवस्थान

श्री क्षेत्र शनी शिंगणापूरची अन्य देवस्थाने – मुख्य शनी मूर्तीच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख एक भव्य दिव्य असे मंदिर देवस्थानने बांधलेले आहे. प्रस्तुत मंदिरात शनी शिंगणापूरच्या गावकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे खालील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलीली आढळुन येते.

 • विघ्नहर्ता श्री गजानन :- कुठल्याही कार्याचा प्रारंभ ज्यांच्या पूजा व मत्रोच्चाराने होतो अशा गजाननाची मूर्ती य आधी येथे नव्हती. हे मंदिर उभारल्यावर श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा ह.भ.प. गायके महाराज, शनी शिंगणापूर यांच्या हस्ते करण्यात आली.
 • श्री संत महंत उदासी महाराज : – हया महंत उदासी महारांजाच्या काळातच श्री शनिदेवाची महिमा पंचक्रोशीत वाढली. उदासी महारांजाची मूर्ती ट्रस्ट ने मंदिराच्या मध्यभागी बसवलेली आहे. सन १९९० मध्ये मूर्तीची स्थापना केली.
 • श्री विठ्ठल रुक्मिणी
 • श्री कृष्ण भगवान
 • श्री संत ज्ञानेश्वर
 • श्री गुरुदेव दत्त मंदिर
 • कैलासपती शिव शंकर
 • वैकुंठपती श्री विष्णुदेव
 • श्री कालभैरव
 • श्री हनुमानजी
 • ग्रामदेवता लक्ष्मीमाता : – श्री शनिदेवाच्या चौथ-याच्या पूर्व बाजूस ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचे एक छोटेसे उत्तराभिमुख मंदिर आहे. मंदिर फार जुने होते परंतु नुकताच त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळे नवीन वाटते.
  श्री शनिदेवाची पालखी :- महाराष्ट्रातील इतर देवांच्या पालखी परंपरा प्रमाणेच श्री शनिदेवाच्या पादुका असलेली पुरातन पालखी मंदिरात असून भाविक मनोभावे तिची पूजा करीत असतात. वरील जवळपास सर्वच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम २२ मार्च १९९० रोजी खासदार यशवंतरावजी गडाख पाटील अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. किसन महाराज साखरे ( आळंदी देवाची ) ह.भ.प. बन्सी महाराज तांबे ( श्री क्षेत्र नेवासा ) , ह.भ.प. भानुदास महाराजगायके शनी शिंगणापूर यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला. नंददीप :- श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या समोरील भव्य मंदिरात रात्रंदिवस जळणारा गोडेतेलाचा दिवा
  ‘ नंददीप ‘ कायमस्वरूपी प्रज्वलित असतो.

पंचम समाधी :- शनी शिंगणापूर मधील हया अध्यात्मिक वातावरणात श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस पांच समाधी स्पष्ट दिसतात. त्या येथील देवस्थानच्या धार्मिक प्रवृत्तीचे स्पष्ट दर्शन घडवितात. पाच समाधी पुढील प्रमाणे होय : –
१) श्याम बाबा
२) उदासि बाबा
३) पुरुषोत्तम बाबा
४) सत् पुरुष बाबा
५) बानकर भाऊ

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा