अनुकूल उपास्य देवता

आपल्या राशीनुसार उपास्य – पूजनीय देवता

प्रत्येक मनुष्य आपल्या धार्मिक श्रद्धा , भावानावर अधिक जगून मानसिक सुख, समाधान, शांती प्राप्त करीत असतो. शत कोटी लोकसंख्या असलेल्या भारतीयांचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक परिवार , कुळाची, वेगवेगळी देव – देवता आहेत. सर्वसाधरण मनुष्य आपण कोणत्या देवतेची पूजा – अर्चा करावी याबद्दल त्याच्या मनात सतत द्वंद असते , म्हणूनच त्याच्या या चल बिचल पणामुळे त्याला योग्य फलप्राप्ती होत नाही. शा अनिश्चीतेकडून निश्चित परिवर्तनासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच मार्गदर्शन केलेले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीने त्याची राशी, लग्न या आधारे आपापल्या प्रिय कुल देव – देवतेची आराधना , उपासना करायला हवी. आपल्या मार्गदर्शनसाठी खालील तक्ता वाचा.

At a glance:

अ.नं. राशी राशी स्वामी उपास्य देवता
मेष मंगल श्री गणपती , हनुमान
२. वृषभ शुक्र कुलस्वामिनी , लक्ष्मीमाता
३. मिथुन बुध कुबेर, दुर्गादेवी
४. कर्क चंद्र श्री शिवशंकर
५. सिह रवि सूर्य, ब्रम्हा
६. कन्या बुध कुबेर, दुर्गा
७. तुला शुक्र कुलस्वामिनी
८. वृश्चिक मंगळ श्री गणपती, हनुमान
९. धनु गुरु दत्तात्रोय
१०. मकर शनी श्री शनिदेव , हनुमान
११. कुंभ शनी श्री शनिदेव , हनुमान
१२. मीन गुरु बृहस्पती

 

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा