ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा

श्री क्षेत्र नेवासा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेच्या तटावर अनादी काळापासून वसलेले व अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपणारे, सांगणारे एक उत्तम क्षेत्र आहे. परम पावन प्रवरेच्या काठावर बसलेले नेवाशा शहर महणजे वारकरी उर्फ भागवत धर्माचे आध्यात्मिक पीठच होय. नेवासा तीर्थक्षेत्राची ओळख नाही अशी मराठी व्यक्ती महाराष्ट्रभर शोधूनही सापडणार नाही.

विश्ववंदनीय ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि पवित्र भूमी आहे. याच भूमीत माऊलीनी मराठी भाषिकांना गुह्य असा ज्ञानाचा सागर खुला करून दिला व तमाम जगातला ललामभूत ठरणारा ग्रंथ याच भूमीमध्ये १२ व्या शतकात निर्माण केला. ह्याच पवित्र भूमी वर पूर्वी करवीरश्वराचे मंदिर होते आणि त्याच मंदिरातील पवित्र खांबाला (पैस) टेकून श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, आमुतानुभव, हरिपाठ इ. मौलिक ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी केली. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले, परंतु जगाला दिव्य संदेश देणारा पवित्र खांब (पैस) मात्र आजहि अबाधित राहिला. खांबाभोवती मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण. तोच पवित्र खांब एका भव्य दिव्य पुरुषाची जवळ – जवळ ६५० ते ७०० वर्ष वाट पहात उभा होता ती व्यक्ती महणजे वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांची, त्याच्याच जीवन प्रेरणेतून व पवित्र हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार लाखो भाविकांच्या सहकार्यातून झाला आहे.

आज हि देवस्थान स्मरणीय व विलोभनीय वाटते. ज्ञानेश्वर मंदिराच्या ईशान्य भागात आणि वायव्य भागात जर एकट्याने फिरून पहिले तर असंख्य प्रमाणात मोरांचे व पोपटांचे ठावे आजही दृष्टीस पडतात. या ठिकाणी विहार केला तर मनास एक अनामिक गोड शक्तीचा शोध घेण्याची नकळत ओढ निर्माण होते. दर वद्य एकादशीला २० ते २५ लोक एकत्र येऊन या मंदिरात भजन करीत असतात. नेवासा हे क्षेत्र पुरण प्रसिद्ध तर आहेच शिवाय महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाचे आदिपीठ आहे. कारण वारकरी सांप्रद्रायातील जी प्रस्थान त्रयी आहे. त्यातील ज्ञानेश्वरी हा एक श्रेष्ठ ग्रंथ होय. याच कारविरेश्वरांच्या मंदिरात, याच खांबाला टेकून दुसरा अमृताचा अनुभव सांगणारा व श्रोत्यांना पाजणारा ग्रंथ अमृतानुभव निर्माण झाला या ग्रंथांना आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा