अध्यक्षजींची प्रार्थना

President

तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर मध्ये आलेल्या सर्व शनी भक्तांचे मी श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा चे वतीने हार्दिक स्वागत वंदन अभिनंदन करतो . या पृथ्वीतलावरील महामानवाचे जीवन अनेक सुख दुखाने भरलेले गुंफलेले आहे. माणसाच्या मनासारखे त्याचे आयुष्य सुद्धा अस्थिर व चंचल असते. अशा या संसार सागरात आपल्या श्री शनी देवाचे आगळे वेगळे महत्व आहे. आज अनेक पाश्चात्या राष्ट्र विज्ञान व धनसंपदाने समृद्ध असले तरी ते फार धार्मिक व पापभिरू बनले आहेत. आज जरी जगातील बलाढ्य राष्ट्र अमेरिका अनु परमाणुच्या गोष्टी करत असले तरी या राष्ट्रात भारतीय अध्यात्म शक्ती व ज्योतिष शास्त्राचा खूप गवागवा आहे हि गोष्ट विसरून चालणार नाही.

आपल्या नगर जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्र श्री संतांची भूमी मानतो आणि ते खरे सुद्धा आहे.आपल्या ह्या शनी शिंगणापूर येथे जेव्हा पासून मा. गुलशन कुमार निर्देशित ‘ सूर्यपुत्र श्री शनिदेव ‘ या अदभूत बहुचर्चित चित्रपट प्रदर्शीत झाला व प्रख्यात गायिका श्री.अनुराधा पौंडवालाची संगीत कॅसेट विपुल प्रमाणात बाजारात आल्या तेव्हापासून आजतागयत शनी शिंगणापूर गावाकडे केवळ महाराष्ट्रातून नाहीतर संपूर्ण भारतातून शनी भक्तांची रांग लागलेली आहे. अहो नव्हे नव्हे अनेक परदेशातून सुद्धा शनी भाविकांची गर्दी इकडे आल्याची आम्हाला पदोपदी दिसून येते.

श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थांनाची ख्याती दूर दूर घरा दांराना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानाच्या रुपात जगात गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड आहे. अशा या जागतिक ख्याती पावलेल्या देवस्थांनाकडे श्री शनी देवाच्या दर्शनानंतर ह्याच श्री शनी देवावर सामाजिक धार्मिक शास्त्रीय सांस्कृतिक भौगोलिक कौटुंबिक अनुभवाच्या ज्ञानावर आधारलेले पुस्तक सर्व भक्त गण मागू लागले. तशी आम्ही त्यांना काही पुस्तके दाखविली. पण त्याने त्यांचे समाधान होईना. ह्या सर्व गुणांवर आधारित ते एक संशोधनात्मक ग्रंथ मागू लागले त्याचे उत्तर देणे आम्हाला अवघड जात होते.

शेवटी महाराष्ट्रातील सर्व शनी भक्तांसाठी मराठी पुस्तक लिहण्याची विनंती आम्ही हिंदी व मराठीचे पुरस्कृत लेखक प्राचार्य डॉ. बापूराव देसाई नाशिककर यांना केली. त्यांनी ती लगेच मान्य करून आम्हाला थोडयाच दिवसात हा ग्रंथ तयार करून दिला त्यांचे ऋण शब्दातीत आहे. एक गोष्ट मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की महाराष्तील काय संपूर्ण भारतातील लोक अन्य देवांच्या तुलनेने श्री शनी देवाबद्दल उगीच भीती दाखवून आहेत. मी असे अनुभवाने सांगतो की उगीच काही लोक श्री शनिदेवाचे नाव काढताच घाबरतात. त्यांना दरदरून घाम सुटतो. वास्तविक हि सर्व भीती खोटी आहे. श्री शनी देव आपला शत्रू नसून तो मित्र आहे. याची तुम्ही आधी खात्री करा. येथे येवून बघा किती मोठ मोठी माणसे येथे येवून सुखावतात तल्लीन होतात.’ ईश्वर भेटल्याच्या खुशीत त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता जाणवते मग त्यात मोठमोठी केंद्र सरकार व राज्य शासनाचे मंत्री असतात. डॉक्टर्स इंजिनीअर प्राध्यापक खासदार आमदार माननीय जज साहेब वकील मंडळी, पोलीस कमिशनर्स , राजकारणी कार्यकर्ते, विध्यार्थी बुद्धीजीवी , सिनेमा व संगीत क्षेत्रातील उच्चभ्रू वगैरे सर्व मंडळी नितनवीन श्री शनीदेवाच्या दर्शनासाठी येथे येत असतात.

आमच्या देवस्थानच्या वतीने आम्हाला अनेक नवीन सुख सोई भक्तांसाठी करावयाच्या आहे. मग त्यात आदर्श ग्रामीण रुग्णालय, सुंदर परिसर, मोठमोठी भक्त निवास स्थान बांधने, पानासनाला सुशोभित करणे नवनवीन रस्ते बांधने , रस्त्याच्या दुर्तफा बगीचा पथदिव्याने परिसर सुशोभित करणे आणि मुख्य म्हणजे स्थानिक लोकांना व भक्तांना अल्पदरांत वैद्यकीय सेवा देण्यासाठी खाटांचे रुग्णालय बांधने अशी आमची अनेक उद्दिष्ट्ये आहेत. अशा आमच्या श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा देवस्थानाच्या वतीने , विश्वस्तांच्या वतीने प्रस्तुत प्रकल्पासाठी आपण इथे एकत्र या दर्शन घ्या. आम्हास मार्गदर्शन करून उपकृत करा सढळ हाताने देवस्थानला दान करून पुण्य कमवू या धन्यवाद.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा